Pages

रविवार, ५ जून, २०११

बहुलीचे आत्मवृत्त






















मी एक लहानशी बहुली,
लहान मुलींची माझ्यावर साउली

तुही कधी माझ्याशी खेळली होतीस,
माझ्यासाठी भातुकली मंडळी होतीस,

माझ्यासाठी आईकडून झगे शिउन घ्यायचीस,
केसांत मळण्यासाठी फुलेही वेचायशीस,

माझ्या इवल्याश्या हातात बांगड्या घालायचीस,
टिकल्यांनी माझे कपाळ साजावायशीस,

शाळेत जाताना मला माळावर सोडून जायचीस,
परतल्यावर मात्र अगदी कुशीतच घ्यायचीस,

अशीच एके दिवशी मला सोडून गेलीस,
पण त्या दिवशी मात्र तू परतलीच नाहीस,

वाट पाहून तुझी मी खूप दमले,
आठवणीत तुझ्याच या धुळीत पडले,

वाटले येशील तेव्हा मला अंघोळ घालशील,
विस्कटलेले माझे केस सावरशील,

अंगात नवा जागा घालशील,
केसांत टवटवीत फुले माळशील,

पण तू परतलीस मोठी होऊन,
हातात माझ्या जागी झाडू घेऊन,

वाटले तुझ खेळून झाल असेल म्हणून,
कदाचित दुसरीच्या हाती सोपोवाशील,
पण कधीहि ना वाटले मला,
तू मला काचाकुंडीच तोंड दाखवशील