Pages

रविवार, ३१ जुलै, २०११

उन्हाला पाण्याची तहान,
गारव्याला उन्हाची,
माणसाला सुखांची आस,
सुखांना अडचणींची,
तापणाऱ्या जमिनीला सावलीची आशा,
झाडाला सूर्यप्रकाशाची,
रात्रीला पहाटेची ओढ,
दिवसाला रात्रीची,
प्राण्यांना शिकाराची भूक,
शिकाराला पाल्यांची,
पक्ष्यांना घरट्यांची ओढ,
पिल्लांना पक्षांची,
आईला बाळाची ओढ,
बाळाला मायेची,
अतृप्तेला तृप्तपणाची तहान,
तृप्ततेला भाग्याची,
तृप्तताहि परावलंबी असताना,
कसा होईल बरे मनुष्य, तृप्ती?

शनिवार, ९ जुलै, २०११

खूप दिवसांनी आज
मन विचार करू लागले,
कधीही तोंडावर न आलेले
ते शब्द बोलू लागले,

कानांनीहि ते ऐकले,
अन हृदयानी सोसले,
खूप दिवसांनी आज
मन कविता करू लागले,

ओठांवरचे हास्य आज
आसवांमध्ये बदलले,
कधी नव्हे ते आज
त्याचे चित्र नजरेत उतरले,

मीही डोळे घट्ट मिटले,
आसवांना थांबवले,
त्याच्या आठवणींना
नजरेआड घातले

पुन्हा माझ्या मार्गावर
माझे पाऊल टाकले,
दिशाभूल होणाऱ्या माझ्या
मनाला पुन्हा सावरले...!!!