Pages

बुधवार, २७ एप्रिल, २०११

Ring Ring

Boy: Hello

(Call Enden)

Ring Ring

Boy: Hello

Girl: Hello, How are you?

Boy: What Happened?

Girl: Nothing, just thought of talking to you after so many months!

Boy: Ok, I'm busy, Call You Later!!!

Girl: No need to lie, I know you wont!

(Hang Up)

Girl(Text): I was so happy today...So thought of talking to you to convert my happiness to normal mood...Thank You!

Boy(Test): I'm glad too!

Girl(Text): Glad for what? For making me disappointed? By the way, I don't know it's a good news or bad news for you but I got a prize.

Boy: I am not a devil to make people sad. Its proud that you got it...You deserve it... Hartley, congrats....




तू मला विसरला असलास तरी मी तुला विसरले नाही,
दुःख कोणाशीही वाटायला मला आवडत नाही,
पण माझ्या आयुष्यातलं सर्व सुखांत मी तुला सामील करेन,
जरी तुझ्यासाठी ते महत्वाचे नसले तरी तुला ते सांगेन!

शुक्रवार, २२ एप्रिल, २०११

कृतघ्न तुझा स्वभाव पाहून आज मी खूप खुश आहे,
तुझ्यासवे राहण्याची कधीतरी इच्छा करणारी मी, आज तुझ्यापासून दूर आहे!

तुझा वरवरचा स्वभाव पाहून, ओढ कधीतरी लागलेली तुझी,
आज तुला नीट जाणून घेतल्यावर, मी तुझ्यापासून दूरच बरी

तुझ्या कल्पनाशक्तीवर कधीतरी गर्व होता मला,
पण आता कळले कल्पनाशाक्ती तर दूरच तुझे स्वविचारही नाहीत तुला

कधीतरी तुझ्या या, भोळ्या चेहऱ्यावर मी विश्वास ठेवलेला,
तो विश्वास तर तू गमावलाच, गमावालेस आज तू मला

आता मैत्रीत्व तर दूरच शत्रुत्वहि नाही तुझ्याशी,
तुझ्या अशा वागण्याने घीण येते मला तुझी

तरी आशा आहे कि तू सुखी राहशील,
भविष्यात तुझ्याबरोबर काही सोबती असतील

एकच शेवटच सांगावस वाटत,
गर्वाच घर कधीना कधी खाली होत

जीवनाचा प्रवास थोडा जपून कर,
आयुष्यात शेवटी मान खाली जाणार नाही ना हे बघ.

घरकुल
छोटसं एक घरकुल असावं,
सर्वांनी त्यात एकत्र राहावं
मिळून मिसळून सुख वाटावं,
संकटांत एकमेकांच्या साथ असावं

छोटसं एक घरकुल असावं,
अंघोळीसाठी लाईनीत उभ राहावं
जेवायला मोठ्या पंगतीत बसावं
छोट्याश्या त्या घरात गर्दी करून राहावं

छोटसं एक घरकुल असावं,
आई-बाबासावे काका-काकुंच प्रेम मिळावं
आजोबांच्या खांद्यांवर खेळावं,
आजीच्या गोष्टींत रमावं

छोटसं एक घरकुल असावं,
लहान भावंडांनी एकत्र खेळावं
घरापाठी खुलं अंगण असावं,
चांदण्या रात्री तिथे एकत्र बसावं.

छोटसं एक घरकुल असावं!!!

लहान एका मुलीची
लहानशी इच्छा,
निळसर आकाशी
उडण्याची आकांक्षा

आधार द्यायला तिला,
आई तिच्या पाठीशी
आकाशी उडताना,
धीर देणारी मंडळी

उडायचा प्रयत्न ती,
मनापासून करत आहे
उंच उडताना मात्र,
पडायची भीती आहे

पडली जरी खाली,
तरी नाती आहेत झेलणारी
पण पडायचं नाही,
असं ठरवलंय मनाशी

प्रवास हा गाठताना,
देवातुझी साथ दे
उंच उंच उडताना,
जरा तुझा हाथ दे

आयुष्य आणि गणित

आयुष्य हा जणू गणिताचा विषय,
जन्मल्यापासून शिकतो आपण,
एकमेकांशी करायला हिशेब,

नातेवाईक, सवंगड्यांना मिळवत जातो,
नावडत्या व्यक्तींना वजा करू लागतो,
हळूहळू बेरीज गुणाकारात रुपांतरीत होते,
जवळच्या व्यक्तींशी आणखीनच गट्टी होते

अनेक प्रसंगातून कधी कधी,
जवळचे लांब जाऊ लागतात
आणि आपल्या आयुष्यात
भागाकार सामील होतात

जीवन जगणे, हि एक कला आहे,
सर्वांच्या उत्तरांत भिन्नता आहे
काहीना अगणित उत्तरं मिळतात,
तर शून्य मिळतात काहींना!
जगाच्या पाठीवर आले तुझ्यामुळे,
चालायला बोलायला शिकले तुझ्यामुळे,
चेहऱ्यावर हास्य, जीवनात सुख तुझ्यामुळे,
नाही डोळ्यात अश्रू, नाही मनात दुःख,
जे इच्छिले, ते मिळाले तुझ्यामुळे,
आयुष्यात माझ्या सदैव रहा,
अजून यशस्वी होण्यात हातभार गेड रहा!


शनिवार, १६ एप्रिल, २०११


जेव्हा तुला पाहिलं तेव्हा वाटल ओळख करावी,
जेव्हा ओळख झाली तेव्हा वाटल मैत्री करावी,

जेव्हा मैत्रीच्या नात्यात पाऊल टाकले तेव्हा कळले,
चूक माझी अन सोबत तुझी पाहताच मागे वळले,

म्हणल त्या चार दिवसाच्या चांगल्या आठवणी जपाव्या,
पण तुझ्या अशा कृत्यांनी त्या आठवणीही नासल्या,

चांगल्या गोष्टींतही तुझ्या स्वार्थ आता दिसतो,
कितीही चांगला असशील तू, पण आता वाईटच वाटतो!