Pages

शुक्रवार, २२ एप्रिल, २०११


आयुष्य आणि गणित

आयुष्य हा जणू गणिताचा विषय,
जन्मल्यापासून शिकतो आपण,
एकमेकांशी करायला हिशेब,

नातेवाईक, सवंगड्यांना मिळवत जातो,
नावडत्या व्यक्तींना वजा करू लागतो,
हळूहळू बेरीज गुणाकारात रुपांतरीत होते,
जवळच्या व्यक्तींशी आणखीनच गट्टी होते

अनेक प्रसंगातून कधी कधी,
जवळचे लांब जाऊ लागतात
आणि आपल्या आयुष्यात
भागाकार सामील होतात

जीवन जगणे, हि एक कला आहे,
सर्वांच्या उत्तरांत भिन्नता आहे
काहीना अगणित उत्तरं मिळतात,
तर शून्य मिळतात काहींना!

1 टिप्पणी:

  1. Hey, What's up there & how're you...you may be thinking that who am I...soI'm Ganesh mahalkar from Ahmednager, Maharashtra & A student for XIIScience.I read your blog first time & Why, I don't know..but when I readyour post, I get your every feelings. I like your blogs. you post the realstory of life..the truth is there...in your post...I'd really like to sharemy feelings with you..I'd like to lissten you...Can we friends forfacebook or else any other social networking ?I Hope...!

    उत्तर द्याहटवा