Pages

शुक्रवार, २२ एप्रिल, २०११


लहान एका मुलीची
लहानशी इच्छा,
निळसर आकाशी
उडण्याची आकांक्षा

आधार द्यायला तिला,
आई तिच्या पाठीशी
आकाशी उडताना,
धीर देणारी मंडळी

उडायचा प्रयत्न ती,
मनापासून करत आहे
उंच उडताना मात्र,
पडायची भीती आहे

पडली जरी खाली,
तरी नाती आहेत झेलणारी
पण पडायचं नाही,
असं ठरवलंय मनाशी

प्रवास हा गाठताना,
देवातुझी साथ दे
उंच उंच उडताना,
जरा तुझा हाथ दे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा