आज खूप दिवसांनी पाहिलं त्याला,
खूपच तो बदललेला,
बघून हसण तर दूरच,
पैसे पडत होते ओळख दाखवायला,
एका कोपऱ्यात मी बसलेले,
दुसऱ्या कोपऱ्यात तो अन त्याची सखी,
मैत्री तर आमची कधीच संपलेली,
पण आता झालो होतो आम्ही अनोळखी,
त्याच्याशी बोलावेसे वाटत होते,
त्याने निदान ओळख दाखवायची वाट पाहत होते,
तिरक्या डोळ्यांनी त्याने पहिले माझ्याकडे,
पाहताच क्षणी मात्र त्याने नजर फिरवली,
त्याने घराची वाट धरली,
मी मात्र तिथेच उभी होते,
दोन क्षणातच त्याने,
खोलीबाहेर पाऊल टाकले,
खूप काही बोलायचे होते,
पण त्याने संधीच दिली नाही,
खूप काही विचारायचे होते,
पण त्याने ओळखच दाखवली नाही,
ज्या दिवशी त्याने बोलणे टाकले,
तेव्हा वाटले कि, संगतीचा परिणाम असावा,
जेव्हा थोडक्यात बोलून संवाद संपवला,
तेव्हा वाटले कि, त्याला माझी मैत्री नको असावी,
पण आज जेव्हा त्याने पाठ फिरवली,
तेव्हा वाटले कि, जणू त्याला मीच नको असावी,
तसे त्याने स्पष्ट सांगावे तरी,
मी फिरणार नाही मग माघारी,
मी एक जिवंत व्यक्ती आहे,
बाहुली नाही बोलणारी,
बटण दाबले कि बोलणारी,
नाहीतर चिडीचूप बसणारी,
खूपच तो बदललेला,
बघून हसण तर दूरच,
पैसे पडत होते ओळख दाखवायला,
एका कोपऱ्यात मी बसलेले,
दुसऱ्या कोपऱ्यात तो अन त्याची सखी,
मैत्री तर आमची कधीच संपलेली,
पण आता झालो होतो आम्ही अनोळखी,
त्याच्याशी बोलावेसे वाटत होते,
त्याने निदान ओळख दाखवायची वाट पाहत होते,
तिरक्या डोळ्यांनी त्याने पहिले माझ्याकडे,
पाहताच क्षणी मात्र त्याने नजर फिरवली,
त्याने घराची वाट धरली,
मी मात्र तिथेच उभी होते,
दोन क्षणातच त्याने,
खोलीबाहेर पाऊल टाकले,
खूप काही बोलायचे होते,
पण त्याने संधीच दिली नाही,
खूप काही विचारायचे होते,
पण त्याने ओळखच दाखवली नाही,
ज्या दिवशी त्याने बोलणे टाकले,
तेव्हा वाटले कि, संगतीचा परिणाम असावा,
जेव्हा थोडक्यात बोलून संवाद संपवला,
तेव्हा वाटले कि, त्याला माझी मैत्री नको असावी,
पण आज जेव्हा त्याने पाठ फिरवली,
तेव्हा वाटले कि, जणू त्याला मीच नको असावी,
तसे त्याने स्पष्ट सांगावे तरी,
मी फिरणार नाही मग माघारी,
मी एक जिवंत व्यक्ती आहे,
बाहुली नाही बोलणारी,
बटण दाबले कि बोलणारी,
नाहीतर चिडीचूप बसणारी,
hoooo kaaaaa...?????
उत्तर द्याहटवा