Pages

मंगळवार, २९ मार्च, २०११

भारतात असताना होती अमेरिकेला यायची हौस,
पण इथे नाही आहे तिथल्यासारखी मौज,
सुखसोई आहेत इथे भरपूर,
पण तरी आठवत ते इवलास घरकुल,

घर इथली आहेत खूप खूप मोठी,
पण घरांच्या पाठी अंगण नाही,
थंडीत आहे सोई हिटरची,
पण शेकोटीची उबच वेगळी,

हॉटेल्सहि इथली आहेत खूप मोठी,
पण तिथे मिळत नाही भली पोळी,
आईस क्रीमस आहेत निरनिराळी,
पण मिळत नाही कुल्फी,

क्रिसमससाठी मिळत असली जरी सुट्टी,
साजरी नाही होत इथे दिवाळी,
कितीही पेटवल्या जरी मेणबत्त्या,
तरी हव्याशा वाटतात त्या गणेशोत्सवातल्या आरत्या,

इथे येऊन मी नाही दुःखी,
पण आठवण येते खूप घरची!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा