कविता वाचून कोणीतरी विचरले,
अन् चित्र पाहून उद्गारले,
इतक्या कल्पना तुला कशा सुचतात?
अन् त्यांना वळण तू कशी देतेस?
खुदकान हसले मी गालांत,
विचार आला माझ्या मनात,
या प्रश्नाचं उत्तर असं द्यावं,
कि सर्वांच्या शंकांचं निरसन करावं,
इतकं काही अस्तित्वात असताना
कल्पना हव्याच कशाला?
सत्य ते लिखाणांत उतरवावे,
अन् प्रसंग कागदांवर रेखावेत,
कविता करण्याआधी कल्पना,
चित्राची सुरवात करताना देखावा,
अशा गोष्टींवर का अवलंबून रहा?
आपलेच अनुभव कागदावर उतरवा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा