Pages

गुरुवार, २६ मे, २०११

cartoons by me




मी काढलेली नैसर्गिक चित्रे


मी काढलेली संकल्प चित्रे






pot paintings by me


मी काढलेली मुक्तहस्त चित्रे



मी रंगवलेल्या व्यक्तिरेखा



मी काढलेले वारली चित्र


Pokemon by me


बुधवार, २५ मे, २०११


कालपर्यंत तो, माझ्या डोळ्यांसमोर होता,
त्याचा आवाज माझ्या कानांत घुमत होता,
माझ्या या हातांत त्याचा हात होता,
ओठांवर माझ्या, त्याच्याशी होणारा संवाद होता,

अचानक विजांचा कडकडाट झाला,
आकाशात मेघांनी उच्छाद मांडला,
अवतीभोवती वातावरण बदलले,
सर्वत्र पावसाने थैमान मांडले,

काळोखात त्या, तो दिसेनासा झाला,
गडगडाटा, त्याचा आवाजही हरवला,
हातातून माझ्या, त्याचा हात सुटला,
तिथेच आमच्यातला संवादही तुटला,

डोळ्यांना या, त्याला पाहण्याची आस आहे,
कानही त्याचा आवाज ऐकण्यास आतुर आहेत,
हातहि हे आता, त्याचा हात शोधात आहेत,
शब्दही फुटण्यासाठी त्याची वाट पाहत आहेत

मंगळवार, २४ मे, २०११


मी आज त्याला खूप काही बोलले,
पण त्याने मात्र एकच वाक्य ऐकले,
मी त्याला मनातले सर्व भाव वदले,
पण त्याने मनात नसलेलेच वेचले,

काळजीपोटी अनेक शब्द कानी घातले,
पण त्याने मात्र त्यातले कटूच ऐकले,
भावनाविवश होऊन त्याला सत्य सांगितले,
पण त्याच्यापर्यंत मात्र खोटेच पोचले,

भीतीपोटी जे शब्द उरात जपलेले,
आज बोलल्यावर ते वाईट ठरले,
म्हणूनच मी आता मनाशी ठरवले,
'यापुढे जपून वाघायाचे,' स्वतःलाच वचन दिले

रविवार, २२ मे, २०११

आज खूप दिवसांनी दैनंदिनी लिहायला बसले,
इतक्या दिवसानंत जीवनात खूप काही घडले.
जेव्हा रोज दैनंदिनी लिहायचे तेव्हा काही सुचायचे नाही,
आज खूप काही लिहायचे आहे पण तिची पाने पुरीशी नाहीत!

रविवार, १ मे, २०११

अपूर जीवन, अतृप्त माणूस
कधी कधी असंही होत, पाऊस पाहून मन मोहरत,
तर अशा त्या पावसातच, कधी दुःख उभरत

कधी कधी असंही होत, एखाद्याला पाहून खुदकन हसू येत,
तर कधी त्यालाच पाहून, डोळ्यांत टचकन पाणीही येत

कधी कधी असंही होत, ऋतुंबरोबर मानसाच मनही बदलत,
स्वतःच बदलत असताना, 'आपण आधीच चांगले होतो' असंही वाटत

कधी कधी असंही होत, कुत्र्यांच्या भूंकण्यातहि जीव रमतो,
तर कधी सन्नाटा हवासा वाटतो, तेव्हा चिमण्यांचा चिवचिवाटहि नको होतो

कधी कधी असंही होत, जीवनात आनंदचा लाभ व्हावा असं वाटत,
पण तो झाल्यावर मात्र, दुःखांना आमंत्रण द्यावास वाटत

कधी कधी असंही होत, भूक लागते तेव्हा जेवण नसत,
आणि ताट समोर असत, तेव्हा भुकेल रहावस वाटत

कधी कधी असंही होत, कधी कधी तसंही होत,
जीवन नेहमी अपूर असतं, माणूस नेहमी अतृप्त असतो

हे नेहमी असंच असत!