Pages

मंगळवार, २४ मे, २०११


मी आज त्याला खूप काही बोलले,
पण त्याने मात्र एकच वाक्य ऐकले,
मी त्याला मनातले सर्व भाव वदले,
पण त्याने मनात नसलेलेच वेचले,

काळजीपोटी अनेक शब्द कानी घातले,
पण त्याने मात्र त्यातले कटूच ऐकले,
भावनाविवश होऊन त्याला सत्य सांगितले,
पण त्याच्यापर्यंत मात्र खोटेच पोचले,

भीतीपोटी जे शब्द उरात जपलेले,
आज बोलल्यावर ते वाईट ठरले,
म्हणूनच मी आता मनाशी ठरवले,
'यापुढे जपून वाघायाचे,' स्वतःलाच वचन दिले

२ टिप्पण्या: