Pages

बुधवार, २५ मे, २०११


कालपर्यंत तो, माझ्या डोळ्यांसमोर होता,
त्याचा आवाज माझ्या कानांत घुमत होता,
माझ्या या हातांत त्याचा हात होता,
ओठांवर माझ्या, त्याच्याशी होणारा संवाद होता,

अचानक विजांचा कडकडाट झाला,
आकाशात मेघांनी उच्छाद मांडला,
अवतीभोवती वातावरण बदलले,
सर्वत्र पावसाने थैमान मांडले,

काळोखात त्या, तो दिसेनासा झाला,
गडगडाटा, त्याचा आवाजही हरवला,
हातातून माझ्या, त्याचा हात सुटला,
तिथेच आमच्यातला संवादही तुटला,

डोळ्यांना या, त्याला पाहण्याची आस आहे,
कानही त्याचा आवाज ऐकण्यास आतुर आहेत,
हातहि हे आता, त्याचा हात शोधात आहेत,
शब्दही फुटण्यासाठी त्याची वाट पाहत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा