अपूर जीवन, अतृप्त माणूस
कधी कधी असंही होत, पाऊस पाहून मन मोहरत,
तर अशा त्या पावसातच, कधी दुःख उभरत
कधी कधी असंही होत, एखाद्याला पाहून खुदकन हसू येत,
तर कधी त्यालाच पाहून, डोळ्यांत टचकन पाणीही येत
कधी कधी असंही होत, ऋतुंबरोबर मानसाच मनही बदलत,
स्वतःच बदलत असताना, 'आपण आधीच चांगले होतो' असंही वाटत
कधी कधी असंही होत, कुत्र्यांच्या भूंकण्यातहि जीव रमतो,
तर कधी सन्नाटा हवासा वाटतो, तेव्हा चिमण्यांचा चिवचिवाटहि नको होतो
कधी कधी असंही होत, जीवनात आनंदचा लाभ व्हावा असं वाटत,
पण तो झाल्यावर मात्र, दुःखांना आमंत्रण द्यावास वाटत
कधी कधी असंही होत, भूक लागते तेव्हा जेवण नसत,
आणि ताट समोर असत, तेव्हा भुकेल रहावस वाटत
कधी कधी असंही होत, कधी कधी तसंही होत,
जीवन नेहमी अपूर असतं, माणूस नेहमी अतृप्त असतो
हे नेहमी असंच असत!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा