Pages

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११



तुझ्यासवेत वाढले,
तुझ्याचसोबती खेळले,
पाहुनी आज तुला,
दिस ते आठवले मला.

बागेत ते हिंडणे,
भातुकली मांडणे,
लहानपण सारे,
गप्पागोष्टींत सरले.

दूरदेशी आज मला,
आठवतो तो मळा,
मामाचं घर,
आणि बाहुलीचा लळा.

अजून तीन वर्ष,
राहायचं आहे परदेशी,
बालपणाच्या आठवणी,
ठेउन उराशी.

४ टिप्पण्या: