देवाची कल्पनाशक्ती
देवा, तुझी कशी हि कल्पनाशक्ती?
अगणित रचना तुला कशा रे सुचती?
प्रत्येकाचा निराळा चेहरा, निराळीच बुद्धी,
भावनाहि प्रत्याकाची इतरांहून निराळी,
कोणी असे शांत अन अबोल,
कोणाच्या रोमा-रोमांत मस्ती,
कोणी रमे मेळाव्यात,
कोणाचा आनंद एकांतात,
कोणाचे मन फुलांहून हळवे,
कोणाचे दणकट पाषाणाप्रमाणे ,
कोणाला रस आकड्यांत,
कोणाचे पाय नाचती तालांत,
कोणी शोधे जादू रासायानांत,
कोणी देई वाद्यांना साथ,
कोणाच्या हातून होई लोकांचे उपचार,
कोणाच्या गळ्यात मधुर आवाज,
इतके वेगळेपण असतनाही,
सर्व एकत्र राहतात जगतात,
तुझ्या अशा निराळ्या कल्पनांना,
सर्व जगताचा सलाम,
प्रत्येकाला अनोखे अस्तित्व दिल्याबद्दल,
तुझे खूप खूप आभार!
देवा, तुझी कशी हि कल्पनाशक्ती?
अगणित रचना तुला कशा रे सुचती?
प्रत्येकाचा निराळा चेहरा, निराळीच बुद्धी,
भावनाहि प्रत्याकाची इतरांहून निराळी,
कोणी असे शांत अन अबोल,
कोणाच्या रोमा-रोमांत मस्ती,
कोणी रमे मेळाव्यात,
कोणाचा आनंद एकांतात,
कोणाचे मन फुलांहून हळवे,
कोणाचे दणकट पाषाणाप्रमाणे ,
कोणाला रस आकड्यांत,
कोणाचे पाय नाचती तालांत,
कोणी शोधे जादू रासायानांत,
कोणी देई वाद्यांना साथ,
कोणाच्या हातून होई लोकांचे उपचार,
कोणाच्या गळ्यात मधुर आवाज,
इतके वेगळेपण असतनाही,
सर्व एकत्र राहतात जगतात,
तुझ्या अशा निराळ्या कल्पनांना,
सर्व जगताचा सलाम,
प्रत्येकाला अनोखे अस्तित्व दिल्याबद्दल,
तुझे खूप खूप आभार!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा