Pages

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

अपूर्ण स्वप्न 
बाहुलीशी खेळताना
स्वप्न मी पहिले,
भातुकली मांडताना 
तुझ्यात रे गुंतले,

नकळत स्वप्नात त्या
अस्तित्व तुझे भासले,
डोळ्यात तुझ्या पाहता,
विश्व माझे दिसले,

खेळ तो संपला,
अन मी परतले,
डोळे उघडून पाहता,
सत्य ते गवसले

हातात होती बाहुली,
डोळ्यांमध्ये पाणी,
स्वप्नातल्या जगाची,
कहाणीच निराळी

२ टिप्पण्या:

  1. swapn-purti rani,tu nako pahus ratrichi swanp, karan ratrichi swapn apurich rahatat, ratricya kalokhat ti kuthe gadap hotat, mitalelya papnyat dolyatach viratat! divaswapne paha rani, ti purna karanya nako prayatnachi kami, mag bagh aakashicha swarghi utarel avani, hi yashasvi jeevanachi kahani!

    उत्तर द्याहटवा
  2. मुद्दामून स्वप्न मी पाहत नाही,
    गाढ झोपेत ती आपोआप पडतात,
    उमजले मला, कि हे खरे नाही,
    कि डोळे आपोआपच रडतात...

    उत्तर द्याहटवा