Pages

रविवार, ६ फेब्रुवारी, २०११

घरात इतरांच्या पाहता भावंड,
डोळ्यांत माझ्या यायची आसवं,
बाळ  तर मला आधीपासूनच आवडायची,
पण आता वाट पाहत होती एखाद घरात यायची,

अशातच एक दिवस जन्माला माझा भाऊ,
अन माझ्या मनातला मोर लागला नाचू,
आईच्या माहेरात दोन बाळ,
एक नक्षीदार अंगठी, अन एक चांदीच नाण,

मामीची परी होती गोरी गोरी पान,
अन भाऊ माझा होता, आईचा 'लाल',
जन्मदिवस त्याचा श्रावणी सोमवार,
म्हणूनच ठेवलं त्याचं नाव ओमकार,

नाव त्याचं त्याला शोभले फार,
दिसायला तो ससा, त्याचे मोठे मोठे कान,
इतर भावंडाप्रमाणे आम्हीही भांडायचो खूप,
तरी एकमेकांना आठवतो असताना दूर,

इथे एकटी राहत असतानाही,
दिवसातून एकदातरी बोलतो आम्ही,
एक वर्ष गेल जरी,
दुरावा आमच्यात आला नाही...


1 टिप्पणी: