Pages

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

स्वप्नांच्या जगतात या,
आज वावरत असताना,
कधी कधी वाटते मला,
बालपणात जावे पुन्हा

बेधुंद होऊन राहावे,
चिंताविरहित जगावे,
मैत्री करावी सर्वांशी,
गैर नसावा कोणाशी

स्वच्छंद आज उडताना,
मुखवटे लोकांचे पाहताना,
वाटते जणू मला,
त्यांच्यात खरेपणाच नसावा

नाट्यरुपी  या जगतात,
शर्कारावगुंठीत लोक राहतात,
चेहऱ्यावर काही दाखवतात,
मनात निराळ्याच भावना जपतात

मान्य आहे मला,
कि सर्वच सारखे नसतात,
पण मग ते दिसत का नाहीत,
जे सत्यात जगतात?

वाटते परतावे भूतकाळात,
आईच्या मायाळू पदरात,
भले होत्या काही मर्यादा,
परी आपुलकीची होती बरसात

1 टिप्पणी: